परभणी: तिकीट न दिल्यास शिवसैनिकाने दिला आत्महत्येचा इशारा

परभणी: तिकीट न दिल्यास शिवसैनिकाने दिला आत्महत्येचा इशारा

परभणीत शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  नुकताच जाहीर झालेल्या परभणी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी तिकिटांसाठी प्रयत्न सुरु केले आहे. मात्र महापालिका निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन एका शिवसैनिकाने जोरदार गोंधळ घातला. उमेदवारी डावलल्याने शिवसैनिकाने आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे.

“निष्ठावान शिवसैनिकांना डावलून गद्दारांना तिकीट वाटप होत आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी पैसे घेऊन तिकीट विकली,” असा आरोप सुरेश भिसे या शिवसैनिकाने केला आहे.

त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधीच शिवसेनेत असंतोषाचं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे तर21 एप्रिलला मतमोजणी होणार होईल. या महापालिकांसाठी 27मार्च ते 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 7 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. सध्या लातूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे तर परभणीत राष्ट्रावादी तर चंद्रपुरात भाजपची सत्ता आहे.

COMMENTS