परळीच्या गडावर पुन्हा धनंजय मुंडे यांचा झेंडा  !

परळीच्या गडावर पुन्हा धनंजय मुंडे यांचा झेंडा  !

परळी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत पुन्हा सत्ता राखली आहे. परळी बाजार समितीच्या काल झालेल्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या पॅनलला तब्बल 14 जागा मिळाल्या तर पंकजा मुंडे यांच्या पॅनलला केवळ 4 जागा मिळाल्या. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत जास्त जागा मिळवूनही राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळाल नाही. बंडखोर सुरेश धस यांच्या मदतीनं पंकजा मुंडे यांनी झेडपीवर कब्जा केला होता. त्यामुळे या निवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सत्तेचा पुरेपुर वापर करत  पंकजा यांनी बाजार समितीची सत्ता खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. परळी नगरपालिका, परळी मतदारसंघातील झेडपी निवडणुकीत पंकजा यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हा धक्का पकंजा यांना विचार करायला लावणारा आहे.

COMMENTS