परळ- एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखाची मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी त्यांचे मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून केईएममध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केईएम रूग्णालयात जखमींची विचारपूस केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. जखमींवर मोफत उपचार केले जातील, असेही तावडे यांनी सांगितले. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केईएम रूग्णालयात जखमींची विचारपूस केली आहेत. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.
COMMENTS