पाकिस्तानच्या सरकारी वेबसाईटवर चक्क भारतीय राष्ट्रगीत !

पाकिस्तानच्या सरकारी वेबसाईटवर चक्क भारतीय राष्ट्रगीत !

इस्लामाबाद –  पाकिस्तान सरकारची वेबसाईट अज्ञात हॅकर्सकडून काही वेळासाठी हॅक करण्यात आली. या हॅकर्सनी भारताचे राष्ट्रगीत वेबसाईटवर पोस्ट केले. यासोबतच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छादेखील देण्यात आल्या.

आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. हॅकर्सकडून वेबसाईटवर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यासोबत भारताचे राष्ट्रगीतदेखील वाजवण्यात आले.  यानंतर काही वेळानंतर वेबसाईट पूर्ववत करण्यात पाकिस्तान सरकारच्या कर्मचाऱ्यांना यश आले. याआधीही अनेकदा हॅकर्सकडून पाकिस्तानच्या वेबसाईट्स हॅक केल्या आहेत.

दोन महिन्यांआधी पाकिस्तान सरकारच्या तब्बल 30 वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या होत्या. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हा प्रकार घडला होता.

 

 

 

 

COMMENTS