पालकमंत्री एकनाथ शिंदे आमचे ओपनिंग बॅट्समन –  मुख्यमंत्री फडणवीस

पालकमंत्री एकनाथ शिंदे आमचे ओपनिंग बॅट्समन – मुख्यमंत्री फडणवीस

ठाणे – ‘वसाहती वाढतात पण पोलीस ठाणी मात्र होत नाहीत. पोलीस ठाणीही वाढली पाहिजेत असे सांगतानाच पोलिसांना मालकी हक्काची घरे हा प्रकल्प ठाण्यात व्हाययलाच हवा आणि ठाण्यातील पोलिसांना हक्काची घरे देणारच’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नव्याने बांधण्यात आलेल्या ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले.

मुंबईत झालेल्या महाभयंकर जलप्रलयानंतर एकीकडे सेना आणि भाजपात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. ‘मुख्यमंत्री आमचे कॅप्टन असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय’. अशी प्रशंसा एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून केली. त्यानंतर  मुख्यमंत्र्यांनी देखील मागे राहिले नाही, ‘मी जरी कॅप्टन असलो तरी आमचे ओपनिंग बॅट्समन तुम्हीच आहात.’ अशी स्तुतिसुमने शिंदे यांच्यावर उधळली.

नव्याने बांधण्यात आलेल्या ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. यावेळी मुख्यमंत्री व शिंदे एका व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी ठाण्याच्या महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल,  पोलीस आयुक्त परमबीर सिंग, आमदार प्रताप सरनाईक, आमदार जीतेंद्र आव्हाड, संजय केळकर आदी उपस्थित होते.

COMMENTS