पालकांनी सरकारच्या भरवशावर मुलांना सोडून देऊ नये,  योगी आदित्यनाथ यांचे धक्कादायक विधान

पालकांनी सरकारच्या भरवशावर मुलांना सोडून देऊ नये, योगी आदित्यनाथ यांचे धक्कादायक विधान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धक्कादायक विधान केल आहे. एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘असं होऊ नये की मुलं दोन वर्षाची झाल्यानंतर पालकांनी त्यांना सरकारच्या भरवशावर सोडून द्यावं.सरकारने त्यांचा सांभाळ करावा असं त्यांना वाटू नये’. योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरचा उल्लेख केला नसला तरी अनेकांनी नेमकं यातून योगी आदित्यनाथांना काय म्हणायचं आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील बालकांच्या मृतांची संख्या 105 वर गेली आहे. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला होता. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला होता.

COMMENTS