पालघरमधून भाजपचे राजेंद्र गावित विजयी, काँग्रेस पाचव्या स्थानावर, वाचा अंतिम आकडेवारी !

पालघरमधून भाजपचे राजेंद्र गावित विजयी, काँग्रेस पाचव्या स्थानावर, वाचा अंतिम आकडेवारी !

पालघर – पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे श्रीनिवास वनग यांचा 29572 मतांनी पराभव केला आहे. राजेंद्र गावित यांना 272782 मते मिळाली आहेत. तर श्रीनिवास वनगा यांना 243210 मते मिळाली आहेत. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव हे तिस-या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांना 222838 मते मिळाली आहेत. चौथ्या स्थानावर माकपचे उमेदवार किरण घाला राहिले आहेत. त्यांना 71887 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार थेट पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांना केवळ 47714 मते मिळाली आहेत.

या मतदारसंघात भाजप विजयी झाले असेल तरी शिवसेनेलाही चांगली मते मिळाली आहेत. पहिल्यांदा निवडणुक लढवूनही शिवसेननं केवळ भाजपपेक्षा फक्त 29 हजार कमी मते मिळवली आहेत. तर हिंतेंद्र ठाकूर यांना अडीच लाख मंताची अपेक्षा असताना त्यांना केवळ सव्वादोन लाख मते मिळाली आहेत. त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा सुमारे 25 हजार मते कमी मिळाली आहेत. काँग्रेसला मात्र या ठिकाणा दारुण पराभावाला सामोरं जावं लागलंय. त्यांना केवळ 47 हजार 714 मते मिळाली आहेत.

2014 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांना तब्बल 533201 मते मिळाली होती. यावेळी शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तरी त्यांची मते 515992 होतात. म्हणज्ये 17 हजार 209 मते घटली आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं बविआला पाठिंबा दिला होता. त्यावेळी बविआला 293681 मते मिळाली होती. यावेळी बविआला आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज ही 270552 मते मिळाली आहेत. म्हणज्ये मोदी लाटेपेक्षाही यावेळी तब्बल 23 हजार 129 मते कमी मिळाली आहेत.

COMMENTS