पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये एका विद्यार्थ्याने भाजपचे वणी येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अश्विनी संजीवरेड्डी बोदकुरवारच्या हाताची बोटं कापली आहेत या हल्ल्यात या तरुणीचे बोट तुटले असून ती गंभीर जखमी झाली आहे. राजेश बक्षी असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा आरोपी आणि पीडित मुलीमध्ये काही कारणावरुन वाद झाले. यातूनच मुलीवर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये मुलीच्या हाताची बोटे कापली गेली असून उपचारासाठी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हल्ला करणा-या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अश्विनी बोदकुरवार आणि आरोपी राजेश बक्षी ताथवडे गावातील बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये शिकत आहेत. यापूर्वीही राजेशने अनेकदा अश्विनीची छेड काढल्याची माहिती पुढे येत आहे. राजेशला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
COMMENTS