पिंपरी पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी करणार अहमदाबाद दौरा !

पिंपरी पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी करणार अहमदाबाद दौरा !

पिंपरी  – गुजरातमधील अहमदाबाद येथील बीआरटी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी पिंपरी -चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी,  नगरसेवक अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबाद अभ्यास दौरा करणार आहेत.  त्याला मंजुरी देण्यचा विषय स्थायी समिती सभेसमोर ठेवला आहे. दरम्यान, या अभ्यास दौ-यासाठी किती खर्च येणार ? याबाबत गुप्तता बाळगण्यात येत आहे.

वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या विचारात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी 10 रस्त्यांवर बीआरटीएस वाहतूक सेवेचे नियोजन केले आहे. तथापि, केवळ दोन रस्त्यांवर बीआरटीएस सेवा सुरु आहे. रेंगाळलेले बीआरटीचे मार्ग सुरु करण्यासाठी वेगाने प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.

महापालिका पदाधिका-यांना बीआरटीची अधिक माहिती मिळावी, म्हणून पालिका पदाधिका-यांचा अहमदाबाद अभ्यास दौ-यांचे आयोजन केले आहे. त्यानुसार सार्वजनिक वाहतूक यावर अहमदाबादचे शिवानंद स्वामी यांनी अडीच दिवसाची कार्यशाळेचे नियोजन केले आहे. या अभ्यास दौ-यांत महापालिका महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका व पालिका अधिका-यांचा समावेश असणार आहे.

या कार्यशाळेत विकास योजना, गमनशीलता योजना, नगर नियोजन योजना, स्थानिक पुनर्विकास योजना, नदी विकास योजना, वर्तुळाकर रस्ते, मेट्रो वाहतूक प्रणाली, बीआरटीएस वाहतूक प्रणालीचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच अहमदाबाद शहरातील सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.

 

 

COMMENTS