पीकविमा मुदतवाढीच्या बोगस जी.आर.पासून सावधान!

पीकविमा मुदतवाढीच्या बोगस जी.आर.पासून सावधान!

पीकविमा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. पण शासनाने अर्ज वाढवण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. पण याच मुदतवाढीचा एक बोगस जी.आर आलाय. या बोगस जी.आर.मध्ये 4 ऑगस्ट ही पीकविम्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसंच बोगस जी.आरपासून सावध राहण्याबाबत सरकारने लोकांना आवाहन केलंय. शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये योग्य जी.आर.ची कॉपी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी याच परिपत्रकावरील माहिती अधिकृत समजावी असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.

 

COMMENTS