पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ द्या – धनंजय मुंडे

पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ द्या – धनंजय मुंडे

पीक विमा भरण्यावरुन राज्यभरात गोंधळ उडाला असून अनेक शेतकरी अजून विमा भरु शकलेले नाहीत. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची तात्काळ मुदत वाढ द्यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. तसंच बँकांमधला ऑनलाईन पीक विमा भरताना गोंधळ उडत आहेत. त्यामुळे ऑफलाईन विमा भरण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी दिलीय. नांदेडमध्ये पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभारलेल्या एका शेतक-याचा मृत्यू झाल्यामुळे सरकारने हे प्रकरण गंभीपणे घ्यावे अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही मुंडे म्हणालेत.

COMMENTS