पंतप्रधान पीकविमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ मिळावी याकरता आज राजू शेट्टींनी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांची भेट घेतली. यावेळी 15 आॅगस्ट पर्यंत पीकविमा मुदत वाढवावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने पीकविमाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे. पीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकराने विमा कंपन्या नेमल्या आहेत. हे काम राज्य सरकारचे अाहे. केंद्र सरकारने आपला वाटा तयार ठेवला आहे. राज्य सरकारने मागितल्यावर देण्याची तयारी आहे. असे कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS