मुंबई – शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप पिकाचा विमा उतरविण्यासाठी आज (31जुलै) ही शेवटची तारीख आहे. मात्र दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक झाले असून. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पिक विम्याबाबत विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला आहे. सरकारने पिक विमा भरण्याची मुदत वाढ करावी अशी मागणी करण्यात येत आहे. 2-3 दिवस शेतकरी रांगेत उभा आहे. रांगेत शेतकऱ्याचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे सरकारने पिक विमा भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी केली जात आहे.
विधानपरिषदेमध्ये पिकविमा विषय घ्यावा, स्थगन प्रस्ताव घ्यावा,अशी मागणी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंनी केली. पिकविमाला 15 दिवसांची मुदतवाढ सरकार देत नाही तोपर्यंत या सभागृहात कामकाजमध्ये सहभागी होण्याची इच्छा नाही. ऑनलाइन पिकविमा भरण्याचे असल्याने शेतक-यांना अडचणी निर्मण होत आहे. त्यामुळे पिकविमा ऑफलाइन विमा भरण्याची सोया उपलब्ध करुन द्यावी. असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
‘शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, विमा उतरविला नाही तर उद्या संकट आले तर काय होईल. सरकारने सांगितले होते की, नोटबंदीची शेवटची रांग असेल. पण ती शेवटची रांग ठरली नाही. रांगेत राहिलेल्या 35 वर्षाच्या शेतकऱ्यांच्या मृत्यू आहे. सरकारने या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 10 लाख मदत दिली पाहिजे.’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानपरिषद कामकाज 15 मिनिटा करता स्थगित करण्यात आले आहे.
COMMENTS