हैदराबाद – रिओ ऑलिम्पिक रौप्य पदकविजेती पीव्ही सिंधूची राजपत्रित पदावर अधिकारी (गट अ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पीव्ही सिंधूला सचिवालयात आमंत्रित करून गौरवले आणि उपजिल्हाधिकारी पदाचे नियुक्ती पत्र दिले.
मुख्यमंत्री नायडू यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देत सिंधू सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ही माहिती शेअर करताना, ‘पीव्ही सिंधूची गट-अ दर्जाच्या पदावर नियुक्ती केली असून तिला अधिकृतरीत्या नियुक्तीचे पत्र बहाल करण्यात आले आहे. सिंधू ही देशासाठी एक आदर्श असून तिच्या पुढील वाटचालीत यशाची अनेक शिखरे ती लीलया पार करेल.’ अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या ट्वीवर सिंधूने प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले असून मी देशवासीयांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत राहीन, असे म्हटले आहे.
COMMENTS