नारायण राणेंना काँग्रेस सोडू नये यासाठी मी स्वतःहा प्रयत्न केले. मात्र आता त्यांनी राजीनामा दिला आहे. पक्ष सोडल्यामुळेच ते आता काँग्रेसवर काहीही टिका करत आहेत. त्याकडे पारसं गांभीर्यानं आम्ही पाहत नाही. राणेंना पुढच्या वाचटालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत अशा शब्दात काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राणेंवर प्रहार केलाय.
मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊनही काँग्रेसनं आश्वासन पाळलं नाही असा आरोपही राणेंनी केला आहे. त्या आरोपालाही दलवाई यांनी उत्तर दिलं आहे. राणेंना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी होती. मात्र त्यांनी एकवेळ मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यावेळी पक्षश्रेष्ठींवर टीका केली. त्यामुळे त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण झाला. तो अविश्वास त्यांनी आता खरा करुन दाखवला त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपद मिळालं नाही असंही दलवाई म्हणाले. धर्मनिरपेक्ष जनता दलातून आलेले सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाले त्यामुळे राणेंनाही तशी संधी होती. मात्र त्यांनी ती गमावली असंही दलवाई म्हणाले.
COMMENTS