‘ही’ 11 गावे होणार पुणे महापालिकेत समाविष्ट

‘ही’ 11 गावे होणार पुणे महापालिकेत समाविष्ट

पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीलगतची 34 गावांच्या समावेशाबाबत आज राज्य सरकारने मुंबई हायकोर्टापुढे प्रतिज्ञा पात्र सादर केले. त्यानुसार 11 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. तसेच पुढील तीन वर्षात टप्याटप्याने या  गावांचा शहराच्या हद्दीत समावेश करण्यात येणार असून पहिल्या टप्यात 11 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत ही गावे  घेण्यावरून वाद होता. ही गावे महापालिकेत आल्यास त्यांचा खर्च झेपणार नसल्याचं काही नेत्यांचं मत होतं, तर काही त्याबाबत आग्रही होते. अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकी दरमान यातील 14 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार देखील घातला होता.

गावांच्या समावेशासाठी हवेली नागरिक कृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 12 जून रोजी झालेल्या सुनावणीत या गावांबाबत तीन आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानुसार आज राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली.

पहिल्या टप्यात 11 गावांचा समावेश करण्यात येणार आहे कारण पालिकेत सर्व गावांचा समावेश झाल्यास, संबंधित भागांतील पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन वर्षात टप्याटप्यात गावांचा समावेश करण्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली त्यानुसार पहिल्या टप्यात 9 गावांचा अशंत: समावेश करण्यात येणार आहे. तर उरुळी देवांची आणि फुरसूंगी ही गावे पूर्णपणे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. तर उर्वरित 23 गावे पुढील 3 वर्षात टप्या टप्याने समाविष्ट करण्यात येणार आहे.

 ही गावे होणार महापलिकेत समाविष्ट 

१) फुरसुंगी

२) उरुळी देवाची

३) धायरी

४) आंबेगाव बु

५) आंबेगाव खुर्द

६) शिवणे

७) उत्तमनगर

८) उंड्री

९) साडेसतरा नळी

१०) केशवनगर

११) लोहगाव

 

 

COMMENTS