पुण्याचे गौतम बाम्बावले यांची चीनमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती

पुण्याचे गौतम बाम्बावले यांची चीनमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती

पुण्यातील गौतम बाम्बावले यांची चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ पुणेकर असलेले गौतम बंबवाले यांची 2015 मध्ये पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

 

यापूर्वी विजय गोखले चीनचे ॲम्बसेडर होते. त्यांची जागा गौतम बाम्बावले घेतील. त्यांनी भूतानचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. ते जपान, चीन, मंगोलिया, उत्तर कोरियाच्या डेस्कचे प्रमुख होते. त्यांनी जर्मनी, अमेरिकेतही त्यांनी काम केले आहे. या सगळ्या देशांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. सध्या ते पाकिस्तानात उच्चायुक्त म्हणून काम करत आहेत. गौतम बाम्बावले हे  1984 च्या फॉरेन सर्विस बॅचचे अधिकारी आहेत.  पाकिस्तानात भारताची बाजू मजबूतपणे मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. चीन विषयी त्यांचा सखोल अभ्यास आहे. डोकलाम मुद्द्यामुळे चीन भारतात आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 

 

 

COMMENTS