पुणे – पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. धनकवडे हे प्रभाग 39 मधून मागासवर्ग या आरक्षित जागेवरुन निवडून आले होते. प्रभाग 39 मधील जागेवर निवडणूक लढवत असताना धनकवडे यांनी कुणबी असल्याचा खोटा दाखला दिला होता. त्यामुळे पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
COMMENTS