शेतकरी संपाचा सर्वप्रथम एल्गार पुकारणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावाचे शेतकऱी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मुंबई येथे बैठकी झाली.
या बैठकीत सरकारच्या कर्जमाफीने नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची खंत शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली. नियमित कर्ज भरणाऱ्याना न्याय मिळावा, प्रोत्साहन मिळावं यासाठी जे 25 हजार देणार आहेत ती वाढउन 50 हजार द्यावे अशी मागणी यावेळी शेतक-यांनी केली.
वीज बिलात सवलत द्यावी, खोट्या केसेस मागे घ्यावा अशा मागण्या शेतक-यांनी यावेळी शरद पवारांना केल्या आहे. या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असे शरद पवारांनी म्हटले आहे.
शेवटी शेतकऱ्यांनी उस्फूर्त व अभूतपूर्व असे संपाचे हत्यार उपसले व त्यामुळेच सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यास तयार झाले.
(३/३) pic.twitter.com/cLxFgZxngP— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 26, 2017
COMMENTS