पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक

सरकारने कर भरणाऱ्यासाठी येत्या 1 जुलैपासून पॅन कार्ड नंबर आधार कार्डला जोडणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. आयकर नियमांमध्ये दुरुस्ती करून केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. सरकारने पॅनसाठी अर्ज करताना 12 अंकी बायोमेट्रिक या नामांकन आयडी देणे अनिवार्य केले आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सन २०१७-१८ च्या वित्तीय विधेयकात कर प्रणालीमध्ये सुधारणा करीत आधारकार्ड हे पॅनकार्डला लिंक करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. काही करबुडवे हे वेगवेगळ्या पॅनकार्डाद्वारे आयकर परताव्यासाठी आयकर विभागाकडे अर्ज करुन सरकारची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले होते. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने आयकर परताव्यासाठी पॅनकार्ड हे आधारकार्डला बंधनकारक करण्यावर अंशत: स्थगिती दिली होती.  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयकर परताव्यासाठी पॅनकार्ड हे आधारकार्डला लिंक करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते.

 

 

COMMENTS