सोने-चांदी दराप्रमाणे यापुढे आता दररोज पेट्रोल-डिझेलचेही दर ठरणार आहेत. 1 मेपासून सुरुवातील 5 शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे दर पाहायला मिळतील. पाच शहरांमध्ये पॉंडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे.
भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या ऑईल कंपन्यानी पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज निश्चित व्हाव्या, अशी मागणी केली आहे. या योजनेसाठी प्रायोगिक तत्वावर पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांत 1 मे पासून ही योजना सुरु होणार आहे. वरील तीन आईल कंपन्यांचे पॉंडेचरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगढ या पाच शहरात जवळपास 200 पेट्रोल-डिझेल पंप आहेत. या ठिकाणी इंधनाचे दर दररोज ठरतील आणि 1 मेपासून दररोज नव्या दरानुसार इंधन मिळणार आहे. दैनंदिन इंधन दराचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास, देशभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
COMMENTS