प्रदेश काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल, 50 टक्के नवे चेहरे ?

प्रदेश काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल, 50 टक्के नवे चेहरे ?

मुंबई – मुंबई प्रदेश काँग्रेसमधील तब्बल 12 विविध सेल बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नव्याने नियुक्त्या करण्यासाठी हे सेल बरखास्त करण्यात आले आहेत. लवकरच त्या जागी नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहे. मात्र या नियुक्ती करताना जवळपास 50 टक्के नवे चेहरे घेतले जाणार आहेत. अशी माहिती काँग्रेसमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रदेश काँग्रेश मधील मोठ्या फेरबदलाचे हे पहिले पाऊल असल्याचं बोललं जातंय. प्रदेश काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि तालुका स्तरावरही लवकरच मोठे फेरबदल केले जाणार आहेत. त्या ठिकाणीसुद्धा 50 टक्के नवे चेहरे घेतले जाणार आहेत. काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि नव्या को-या चेह-यांना संधी दिल्याने पक्षाची स्थिती सुधारेल असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय. हायकमांडनेही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नव्या नियुक्त्या करण्यासाठी मोकळीक दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल अपेक्षीत आहेत.

COMMENTS