“प्रवेशाचा मुहूर्त ठरला नाही, मात्र गरज पडल्यास माझं खातंही राणेंना द्यायला तयार”

“प्रवेशाचा मुहूर्त ठरला नाही, मात्र गरज पडल्यास माझं खातंही राणेंना द्यायला तयार”

सिंधुदुर्ग – नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावरुन ब-याच उलट सुलट चर्चा सुरू आहेत. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राणेंचा भाजप प्रवेश येत्या 27 तारखेला होण्याची शक्यता आहे. त्यातच आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या संदर्भात वक्तव्य केल्याने राणेंच्या भाजप प्रवेशाला बळ आलं आहे.  पक्षाला वाटल्यास माझ्याकडील सार्वजनिक बांधकाम खातंही राणेंना द्यायला तयार आहे असं वक्तव्य त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत दादांनी केलं.

राणेंच्या प्रवेशाचा अजून कुठलाही मुहूर्त ठरला नाही. मात्र एका कर्तुत्ववान माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रवेशाचा विषय असल्यामुळे याचा केंद्रीय पातळीवर निर्णय घेतला जाईल असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असताना सावंतवाडी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

COMMENTS