प्रियंका गांधी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष ?

प्रियंका गांधी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष ?

प्रियंका गांधी या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष बनू शकतात असं वृत्त डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. दिल्लीत नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये उपस्थित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांनी वर्किंग कमिटीच्या मिटिंगच्या शेवटी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काही ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा केल्याचं बातमीमध्ये म्हटलं आहे. सोनिया गांधींनी हा प्रस्ताव ठेवतात त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वीही प्रियंका गांधी यांना पक्षात महत्वाची भूमिका द्यायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियंका गांधी यांनी केवळ अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघाच्या बाहेर पडल्या नव्हत्या. 2019 च्या निवडणुकीपूर्वी पक्षाची कमान तरुण नेत्यांकडे द्यायला हवी अशी काँग्रेसमध्ये मानसिकता आहे. त्यातच गेल्या काही निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला फारसे यश आले नाही. त्यामुळे प्रियंका बाबतच्या बातमीला बळ मिळतं. काही दिवसांपूर्वी परदेशातील एक निवडणूक सल्लागार भारतात आला होता. तेंव्हा त्याने यूपीएच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. काँग्रेसकडून तो प्रियंका गांधी यांना भेटला होता.

COMMENTS