फसवलं …रे फसवलं शिवसेनेला फसवलं, विरोधकांची घोषणाबाजी

फसवलं …रे फसवलं शिवसेनेला फसवलं, विरोधकांची घोषणाबाजी

फसवलं …रे फसवलं शिवसेनेला फसवलं आणि काढलं रे काढलं वेड्यात काढलं.. अशा घोषणांनी विधीमंडळाचे प्रवेशद्वार विरोधकांनी दणाणून सोडले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर सेनेने विरोधकांच्या बरोबरीने सभागृहात आणि सभागृहाबाहेर आंदोलन केले. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृह 12 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांसह दिल्लीला शिष्टमंडळ नेले. मात्र शेतकऱ्यांना आश्वासनांपलीकडे काहीही मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला थोपवण्यासाठी ही खेळी खेळल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिवसेनेसह ही राज्याच्या जनतेची चक्क फसवणूक असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

गेल्या दोन आठवडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही कामकाज चालू दिले नाही. मात्र आज बजेट सादर होणार असून सेनेचे नेते आणि अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांना विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडायचा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना अद्यापही कायम असल्याचे सेनेचे गटनेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS