फी वाढी विरोधात शिक्षण मंत्री तावडेंना पालकांचा घेराव

फी वाढी विरोधात शिक्षण मंत्री तावडेंना पालकांचा घेराव

पुणे – शाळांमध्ये बेकायदेशीरपणे होणाऱ्या फी वाढी विरोधात पालक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संतप्त पालकांनी पुण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडेंना घेराव घातला. आणि शाळेत सुरु असणाऱ्या गैर  प्रकाराला आळा घालून फी वाढीबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे.

राज्यातील शाळांमध्ये होणारी फी वाढ हा पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच पुण्यात पालक संघटनांनी आंदोलन करत शिक्षण मंत्री विनोद तावडे याना घेराव घातला. पुण्यातील भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी विनोद तावडे यांनी हजेरी लावली होती.

राज्यभरातील अनेक शाळांमध्ये हा गैर प्रकार होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. अवाढव्य फी आकारून पालकांना लुटण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे यावर सरकार काय भूमिका घेणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यावर जर पाऊले उचलण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.

COMMENTS