व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्काईप आणि गुगल टॉक सारख्या सेवांवर आता केंद्र सरकार लवकरच बंधनं घालण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.
देशभरातल्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या ट्राय या संस्थेप्रमाणेच सोशल मीडियाची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही एक यंत्रणा असावी, असा कल केंद्र सरकारचा आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्काईप, वी-चॅट आणि गुगल टॉकसारख्या सेवांचा समावेश आहे.या सर्व माध्यमातून होणाऱ्या संवादावर आणि त्याच्या डेटाचा उपयोग या कंपन्या कमर्शियल वापरासाठी करत होत्या. त्यावर निर्बंध घालण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं सरकारचं मत मागवलं होतं. कोर्टाच्या या प्रश्नाला उत्तर देताना सरकारनं या कंपन्यांच्या सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे संकेत दिले. अर्थात हे निर्बंध कोणत्या प्रकारचे असतील हे अद्याप स्पष्ट नाही.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यांचे घटनापीठ तयार केले असून याची सर्व जबाबदार या घटनापीठाकडे सोपवली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणी 18 एप्रिलला होणार आहे.
COMMENTS