कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारबाबत सोशल मीडियावरून बनावट व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचा आयटी विभाग सचिव तरूण सेनगुप्ता याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने ही करवाई केली. 9 जूलैपासून आत्तापर्यंत याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली ही तिसरी व्यक्ती आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर प्रहार केला आहे. सोशल मीडियातून दिशाभूल करणारी बनावट छायाचित्रे पसरवून भाजपचा जातीय दंगली भडकावण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपचा सोशल मीडियातून सुरू असलेल्या धुमाकुळाला पश्चिम बंगालच्या जनतेने थारा देता कामा नये, असे आवाहन बॅनर्जी यांनी येथे एका जाहीर सभेत बोलताना केले.
COMMENTS