बलात्कार प्रकरण, भाजपच्या गडचिरोली जिल्ह्याचे सरचिटणीसला अटक

बलात्कार प्रकरण, भाजपच्या गडचिरोली जिल्ह्याचे सरचिटणीसला अटक

नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून ट्रॅव्हल्समध्ये प्रवासादरम्यान अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून भाजपचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र बावनथडे याच्यावर भांदवी  376 (2) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र बावनथडे हा फरार झाला होता. त्याला शोधून काढण्यात नागभिड पोलिसांना यश आले आहे.
नागपूर-गडचिरोली मार्गावर चालणाऱ्या एआरबी एक्सप्रेस या कंपनीच्या धावत्या ट्रॅव्हल्समध्ये रविंद्र बावनथडे याने एका युवतीसोबत मागील सीटवर अश्लील चाळे केले होते. हा सर्व प्रकार ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ही व्हिडीओ क्लिप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

2 जुलैला  युवतीने बावनथडे याने नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून ट्रॅव्हल्समध्येच शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बावनथडे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र बावनथडे हा फरार झाला होता. नागभिड पोलिसांनी अखेर त्याला शोधून काढत ब्रम्हपुरी येथून अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले जाणार असल्याची माहिती नागभिडचे ठाणेदार मडावी यांनी दिली आहे.

 

 

COMMENTS