बसपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी मायावतींच्या भावाची नेमणूक !

बसपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी मायावतींच्या भावाची नेमणूक !

लखनऊ –  बहुजन समाज पार्टीच्या उपाध्यक्षपदी मायावती यांचे बंधू आनंदकुमार यांची नेमणूक करण्यात आलीय. मायवती यांनीच याबाबतची घोषणा केली. आनंदकुमार यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली असली तरी त्यांच्यासमोर काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या कार्यकाळात आनंदकुमार हे आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, मतदानयंत्रातील फेरफार प्रकरणात आपण भाजप विरोधात कोणत्याही पक्षासोबत जाण्यास तयार असल्याचं मायावती यांनी स्पष्ट केलं. तसंच भाजपकडून लोकशाही धोका असल्याचा आरोप करत लोकशाही जिंवत राहिली पाहिजे यासाठी भाजप विरोधात कोणत्याही पक्षाची मदत घेण्यास तयार आहोत असंही त्यांनी सांगितलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात बसपा, सपा, काँग्रेस या पक्षांची महाआघाडी होण्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.

COMMENTS