प्रिय बापट साहेब, तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही. कोणीही रागवणार नाही. कचऱ्याचा प्रश्न मिटला आहे. आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहात आहेत. महापौर आले. तुम्ही पण या! कॉंग्रेसचे पुणे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उद्देशून हे हटके पोस्टर लावले आहे. पुणे शहरात एकूण चार ठिकाणी अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
पुण्यात मागच्या अनेक दिवसांपासून शहरातील कचरा प्रश्न सर्वाच्या चर्चेचा विषय बनला आहे. परंतु, एवढ्या गंभीर परिस्थिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक हे दोघेही परदेश दौऱ्यावर आहेत. त्यातच काही दिवसांपुर्वी महापौर टिळक परतल्या आहेत, परंतु, गिरीश बापट अजूनही परेदशात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी पुणेरी पद्धतीतील पोस्टरबाजी पहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर कॉंग्रेसकडून गिरीश बापटांविरोधात पोस्टर लावण्यात आले आहे. कचऱ्याचा प्रश्न मिटला असून, आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत अशा आशयाचे हे पोस्टर आहे.
दरम्यान, तब्बल 23 दिवसांनंतर पुण्याची कचराकोंडी फुटली. पुणे भाजपकडून अद्याप या पोस्टरबाजीवर कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.
COMMENTS