बाबरी मशीदप्रकरणी आज (गुरुवारी) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अन्य आरोपींविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली.
1992 ला बाबरी मशिद पाडण्यात आली. त्यानंतर झालेल्या दंगलीत ३ हजार जणांचा बळी गेला होता. तांत्रिक कारणांमुळे अडवाणी आणि इतर काही नेत्यांविरोधातील लखनऊ उच्च न्यायालयात कटाचा गुन्हा काढून टाकण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाने या नेत्यांविरोधात कटाचा गुन्हा चालवण्याचे सुतोवाच काही दिवसांपूर्वी केले होते. इतर नेत्यांत माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांचा समावेश आहे.
COMMENTS