बाबरी मशीद प्रकरण; शिवसेनेच्या माजी खासदाराला जामीन मंजूर

बाबरी मशीद प्रकरण; शिवसेनेच्या माजी खासदाराला जामीन मंजूर

बाबरी मशीद प्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (दि.24) जामीन मंजूर केलाय. सतीश प्रधान हे मंगळवार (दि.23) सुनावणीसाठी गैरहजर होते. सतीश प्रधान यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

यापूर्वी बाबरी मशीद प्रकरणात न्यायालयाने विश्व हिंदू परिषदेच्या पाच नेत्यांनाही जामीन मंजूर केला होता. महंत नृत्यगोपाल दास, महंत रामविलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा उर्फ प्रेमजी, चंपत राय बन्सल आणि धर्मदास हे सहा जण 20 मे रोजी न्यायालयासमोर शरण आले होते. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात दोन खटले दाखल करण्यात आले होते. सीबीआयने चौकशीनंतर या प्रकरणात एकूण 49 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाची लखनौतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याप्रकरणात न्यायालयाला दोन वर्षात निकाल द्यावा लागणार आहे. याप्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

 

COMMENTS