बारामती – शिवसेना शहरप्रमुखाच्या कारने दोन शाळकरी मुलींना चिरडले; संतप्त जमावाने कार पेटवली

बारामती – शिवसेना शहरप्रमुखाच्या कारने दोन शाळकरी मुलींना चिरडले; संतप्त जमावाने कार पेटवली

बारामती- बारामती येथे शिवसेना शहरप्रमुख पप्पू माने यांच्या भरधाव गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडले. शिवसेना शहरप्रमुखाच्या भरधाव कारने चिरडल्याामुळे दोन शाळकरी मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बारामती- मोरगाव रस्त्यावर झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने कार पेटवून दिली. कारचालक पप्पू माने फरार झाला आहे. समिक्षा मनोज वीटकर (वय-13) आणि दिव्या ज्ञानेश्वर पवार (वय- 14) अशी मृत्यूा झालेल्याट मुलींची नावे आहेत. अपघातानंतर संतप्त गावक-यांनी गाडी पेटवली आहे.

 

COMMENTS