शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्यानजीकच्या शिक्षण संस्थेचा अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित संस्थेने स्मारकासाठी ही जागा देण्यासाठी नकार दिला आहे. केरळीय महिला समाज शिक्षण संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्यात आली आहे. याबाबतचे विधेयकही राज्य सरकारने मंजूर केले आहे. सध्या महापौर बंगल्याशेजारीच असणाऱया केरळीय महिला समाज या संस्थेच्या ताब्यात 81 फुटांची जागा आहे. ही जागा महापालिकेने भाडे तत्त्वावर दिली होती. या जागेचा भाडे करार 2016 मध्येच संपला.
आता महापौर बंगल्याचाच एक भाग असलेली ही जागा महापौर बंगल्याच्या जागेसोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी वापरली जाणार आहे. मात्र, ही जागा महापालिकेला परत देण्यास संबंधित संस्थेने नकार दिला आहे. या संस्थेत 15 ते 20 विद्यार्थ्यांचे नर्सरीचे वर्ग चालतात. परंतु, ही जागा लवकरात लवकर परत घेतली जाईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
COMMENTS