मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. महपौर बंगला हे आरक्षण बदलण्याची अधिसूचना राज्य सरकारनं जारी केली आहे. महापौर बंगल्याचे आरक्षण उठवून ते आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आरक्षित करण्यात आले आहे. महापौर बंगल्याची जमीन हरित क्षेत्रातून वगळण्यात येणार आहे. त्याऐवजी रहिवासी क्षेत्र करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगीही घेतली जाणार आहे. आरक्षण बदलासंदर्भात राज्य सरकारने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. महापौर बंगल्याचे क्षेत्रफळ हे 12928 चौरस मीटर आहे.
COMMENTS