पूर्णिया – बिहारमधील पूरग्रस्त भागाची पाहणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केली असून सैन्याच्या हेलीकॉप्टरमधून त्यांनी या संपूर्ण भागाची पाहणी केली. मोदींच्या समवेत यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशिल कुमार मोदीही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पूरग्रस्त बिहारसाठी 500 कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे.
पूर्णिया, कटिहार, किशनगंज आणि अररिया या भागांतील यावेळी पंतप्रधानांनी परिस्थितीची पाहणी केली. यानंतर पूर्णिया येथील सैन्यदलाच्या विमानतळावरील सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळ पूरस्थितीशी संबंधित सर्व अधिकारी तेथे उपस्थित होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली. मोदींनी पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीत बचाव कार्यासाठी 500 कोटी रुपयांचे पॅकेज बैठकीनंतर घोषित केले. एवढेच नाही तर पूरस्थितीचे सर्वेक्षण करण्यासाठी लवकरच केंद्रीय टीम येईल असेही मोदींनी यावेळी सांगितले.
PM Modi announces Rs 500 crore relief for flood-hit Bihar after aerial survey
Read @ANI story | https://t.co/xS8etRXZ65 pic.twitter.com/8ypf9DT8sY
— ANI Digital (@ani_digital) August 26, 2017
COMMENTS