पुणे – देशात सध्या गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करण्याचा पायंडा पडला असून गोरक्षणाच्या नावाखाली खुलेआम हत्या केल्या जात आहेत. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणा-यांमध्ये बहुतांश गोरक्षक हे भाजप, बजरंग दल आणि विश्व हिन्दु परिषद या संघटनेशी संबंधित आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून कधी लव्ह जिहाद तर कधी बीफबंदी सारख्या विषयावरून समाजात धार्मीक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार दिग्वीजय सिंग यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सिंह म्हणाले की, आपला देश चालवण्यासाठी केवळ 56 इंच छाती असणा-या व्यक्तीची गरज नसून 56 इंचाचे ह्रदय असणा-या पंतप्रधानाची गरज आहे, मोदींचे ह्रदय छोटे आहे” अशा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदी मध्ये दूरदृष्टीची कमी म्हणून जीएसटी लागू करण्यासारखे निर्णय होत आहे.
सोशल मिडीयातील अनेक फेक साईट्स मोदीभक्त चालवत असून त्याद्वारे ते प्रक्षोभक लिखाण करून समाजाता दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुज्जफरनगर दंगल हे त्याचेच उदाहरण असून तालिबान मधील एका महिलेची आक्षेपार्ह चित्रफीत मुजफ्फर नगर येथील असल्याचे भासवून ही दंगल घडविण्यात आली. त्यामुळे फेक न्यूज टाकणा-याविरोधात आणि फेक साईट्स चालविणा-या विरोधात कारवाई करणे आवशक्य आहे. असे ही दिग्वीजय सिंग यावेळी म्हणाले.
COMMENTS