बुलेट ट्रेन करणारच, चंद्रकांत पाटील यांच राज ठाकरेंना प्रत्युत्तर !

 बुलेट ट्रेन करणारच, चंद्रकांत पाटील यांच राज ठाकरेंना प्रत्युत्तर !

कोल्हापूर – मुंबईत शुक्रवारी एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मुंबईकरांकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. त्याचबरोबर केंद्राच्या बुलेट ट्रेनच्या निर्णयावरही चौफेर टीका केली गेली. मुंबईत लोकल सेवा जोपर्य़ंत व्यवस्थीत होत नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही विट मुंबईत रचू देणार नाही असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी जबरदस्ती केली तर आम्हालाही करता येते असाही इशारा राज यांनी दिला.

राज ठाकरे यांच्या इशा-याला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांना काय करायचं आहे ते करु दे आम्ही बुलेट ट्रेन करणारचं असं चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात म्हटलं आहे. आता यावरुन दोन नेत्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे ठाकरी शैलीत चंद्रकांत दादांचा कसा समाचार घेतात ते पहावं लागेल.

COMMENTS