बेस्टच्या एसी बसेस अखेर बंद !

बेस्टच्या एसी बसेस अखेर बंद !

मुंबई – तोट्यात असलेल्या बेस्टला सावरण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पांढरा हत्ती म्हणून पोसल्या जाणा-या बेस्टच्या एसी बसेस यापुढे तुम्हाला रस्त्यावर धावताना दिसणार नाहीत. सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईत बेस्टच्या २५ मार्गावर २६६ एसी बसेस धावत होत्या. त्या आता सोमवारपासून रस्त्यावर दिसणार नाहीत. बेस्टचा आर्थिक तोटा वाढवण्यात या एसी बसेसचा मोठा वाटा होता. सध्या बेस्ट खूपच आर्थिक अडचणीत आहे. कर्मचा-यांचे पगार देणंही शक्य नसल्यानं बेस्ट प्रशासनाने कृती आराखडा आखला आहे. ज्यामध्ये एसी बसेेस बंद करण्याचा विचार प्रामुख्याने होता. त्यानुसार पहिला निर्णय एसी बसेस बंद करण्याचा घेतला आहे. यापुढच्या काळात असेच आर्थिक बचत करणारे निर्णय घेतले जाणार आहेत.

COMMENTS