गेल्या महिनाभरापासून बेस्ट कर्मचा-यांच्या पगार मिळालेला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचा-यांमधल्या वाढत्या असंतोषाकडे बघुन मुंबईच्या महापौरांनी बेस्ट कर्मचा-यांच्या पगाराचा तीढा सोडवण्यासाठी उद्या तातडीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत सर्व गटनेते, बेस्ट समिती अघ्यक्ष, बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा करुन बेस्ट कर्मचा-यांच्या पगाराबाबत निर्णय घेतला जाईल.
कोर्टानं 25 तारखेपर्यंत पगार करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन पगार दिले जातील. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार देण्यासाठी बेस्टने काढलेल्या कर्जाची रक्कम 22 मार्चपर्यंत उपक्रमाच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 24 मार्च रोजी पगार मिळेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
COMMENTS