बैलगाडी शर्यतींसाठी येत्या 16 ऑक्टोबरला बेमुदत धरणे आंदोलन

बैलगाडी शर्यतींसाठी येत्या 16 ऑक्टोबरला बेमुदत धरणे आंदोलन

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी येत्या 16 ऑक्टोबरला बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  केंद्र सरकारसह राज्य सरकारने बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करावा, या मागणीसाठी येत्या राज्यातील बैलगाडी चालक-मालक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील बैलगाडी चालक-मालक सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या आंदोलनावेळी बैलगाडी चालक-मालक संघटनाचे पदाधिकारी बैल गाडींसह सहभागी होतील. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बैल बांधणार असून, शर्यत सुरू होणार असा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा बैलगाडी चालक – मालक संघटनेचे पदाधिकारी धनाजी शिंदे यांनी दिला आहे.

 

COMMENTS