कुडाळ – ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसंच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. काँग्रेसनं 2005 साली दिलेलं आश्वासन पाळलं नाही अशा आरोपही राणेंनी केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकवेळा आपला अपमान केला असा आरोपही राणेंनी केला आहे. अशोक चव्हाण यांच्यावर त्यांनी आजही जोरदार हल्लाबोल केला. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन आपण विलासराव देशमुख यांच्याविरोधात तक्रार केल्याचा गौप्यस्फोट केला. तुम्ही मला काय पक्षातून काढता मीच पक्ष सोडतो असंही राणेंनी त्यांनी सांगितलं. राज्यातली काँग्रेस आणि शिवेसना रिकामी करेन असा दावाही राणेंनी केला आहे. राज्यातल्या अनेक नेत्यांनी मला पाठिंबा दिला आहे असंही राणे म्हणाले. यापुढे राज्याचा दौरा करुन आपण लवकरच पुढचा निर्णय घेऊ असंही राणेंनी सांगितलं. दरम्याना माजी खासदार निलेश राणे यांनीही काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Older Post
सोनिया गांधींचे नरेंद्र मोदींना पत्र !
COMMENTS