दिल्ली – सर्व मंत्री आणि अधिका-यांच्या गाड्यांचे लाल दिवे 1 मे पासून बंद होणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता मंत्री व प्रशासकीय अधिका-यांच्या वाहनांवर असलेला लाल दिवा जाणार आहे. 1 मे पासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे .
आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे केंद्रासह इतर राज्यातही हा नियम लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीदेखील काही दिवसांपूर्वी वाहनांवरील लाल दिवा काढण्याचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ आता केंद्रानेही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक मंत्री, प्रशासकीय अधिका-यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
COMMENTS