मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गोटात ?

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गोटात ?

मुंबई महापालिकेत आज मोठी घडामोडी घडत आहे.  मुंबई महापालिकेतील मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत. हे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या  खेळीने एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.

भांडूपमधील पोटनिवडणुकीत काल भाजपची नगरसेविका विजयी झाल्यानं भाजपचं संख्याबळ 83 वर पोहोचले तर सत्ताधारी शिवसेनेचे 84 नगरसेवक आहेत. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होते. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेने चाल खेळत मनसेच्या 6 नगरसेवकांना फोडले. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय मनसेच्या नगरसेवकांनी गटस्थापना करण्याचा प्रयत्न चालवण्याने महापालिकेतील सत्ता समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. शिवसेनेच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपासोबत मनसेलाही काहीसा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

COMMENTS