पुणे – स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकार मधून बाहेर पडली आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
‘सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्याविरोधात आवाज उठवायचा आहे. आम्हाला सत्तेचा मोह नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारशी असणारे सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटने घेतला आहे.’ असे राजू शेट्टी म्हणाले आहे.
यावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, ‘देशात शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढू लागला आहे. शेती तोट्यात जात आहे, हे स्पष्ट होत आहे. गेल्या चार वर्षांत शेतीमालाचे भाव स्थिर राहिले असून, आयात तब्बल पाच पट वाढली आहे. सरकारकडे हमीभावासाठी तसेच शेतीमाल निर्यात करण्यासाठी विशेष धोरण नाही. दीड पट हमी भाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी मिरजेच्या सभेत दिले होते. ते आश्वासन हवेतच विरलं. मी वैयक्तिक त्यासाठी प्रयत्न केले. संसदीय आयुधं वापरून हा विषय लावून धरला. संसदेत ठराव मांडले. केंद्राने जुजबी उत्तरे देऊन हा विषय मारून नेला. निर्णायक भूमिका नसल्याने हा विषय मागे राहिला.’
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणे आणि स्वमीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे. यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेनशाच्या सुरुवातीलाच दिल्लीत जंतर- मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला आहे.
COMMENTS