भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. गोव्यातील डबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पक्षाची बैठक घेतल्यामुळे एका वकिलाने अमित शहा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
भारतीय नौदलाच्या नियंत्रणात असलेल्या विमानतळाचा राजकीय उद्धेशासाठी दुरूपयोग केल्याचा शहांवर आरोप करण्यात आला आहे. या वकिलाचे नाव एरिस रॉड्रिग्ज असे असून त्यांनी नागरी हवाई सचिव व गोव्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांकडे याबाबत तक्रार केली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानतळ खूप महत्वाच असते. अशावेळी विमानतळावर कोणत्याही सार्वजनिक बैठकीचे आयोजन करता येऊ शकत नाही. हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
COMMENTS