बडोदा – झोपडपट्टी हटवल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काल भाजपच्या नगसेवकला बेदम मारहाण केली. भाजपचे नगरसेवक हसमुख पटेल यांना स्थानिक नागरिकांनी चक्क झाडाला बांधून मारहाण केली. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पटेल यांचा जीव वाचला. या प्रकरणी पोलिसांनी 30 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये प्रामख्याने महिलांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्टसीटी अंतर्गत एका ठिकाणची झोपडपट्टी तोडून तिथे सौंदर्यकरण करण्यात येत होतं. मात्र त्याबदल्यात त्यांचं पुर्नवसन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले होते. त्याचा फटका स्थानिक नगरसेवकाला बसला.
COMMENTS