औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. मात्र त्याची सुरूवात आतापासूनच सुरू झालीय. अनेक इच्छुक आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहेत. कुणी खडा टाकून बघत आहेत. आपल्या उमेदवारीचा विषय आला तर काय प्रतिक्रिया उमटतात याचीही अनेकजण चाचपणी करु लागलेत.
औरंगाबाद पूर्वचे भाजपचे आमदार अतुल सावे यांनाही आता खासदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. सध्या आमदार असलेले सावे औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवू इच्छित आहेत. सध्या भाजप आणि शिवसेनेचे संबंध परकाटोचे ताणलेले आहे. सध्याच्या स्थितीत तरी भाजप आणि शिवसेना वेगळे लढणयाची शक्यता आहे. त्यामुळे भाजप शिवसेना वेगळे लढले तर भाजपकडून आपल्याला संधी मिळेल अशी अतुल सावे यांना आशा आहे.
गेल्यावेळी मोदी लाटेप्रमाणे यावेळीही आपण निवडूण येऊ असं त्यांना वाटतंय. भाजप शिवसेना वेगळे लढले तरी काँग्रेस राष्ट्रवादीची मते एमआएमकडे वळतील त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये विभागणी होईल. आणि आपण मोदी सरकारची कामगिरी आणि राज्यातल्या फडणवीस सरकारची कामगिरी यावर विजयी होऊ असे आखाडे ते बांधत आहेत. आता दीड वर्षानंतर काय परिस्थिती निर्माण होते त्यावरच सगळं अवलंबून आहे. मात्र सध्यातरी अतुल सावे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
COMMENTS