नांदेड – नांदेड महापालिकच्या निवडणुकीसाठी रात्री उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा झाली. या सभेत उद्धव यांनी पालिकेतली सत्ताधारी काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर जोरदार टीका केली.
आमचे 25 वर्ष जुने मित्र आहेत. जगातला सर्वात मोठा पक्ष आहे असे ते दावा करतात, त्यांना चंद्र, मंगळ अशा परग्रहावरुनही मिस कॉल येतात. मात्र कुठल्याही निवडणुकीत त्यांना हक्काचे उमेदवार मिळत नाहीत या शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यामुळे ते इतरांचे उमेदवार पळवात असंही उद्धव म्हणाले.
शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. चिखलीकरांचा बेडूक म्हणून उल्लेख केला. या बेडकाच्या प्रचारासाठी मी आलो होतो, मोदी लाट असतानाही शिवसैनिकांमुळे जिंकलास आणि आता पाठित खंजीर खुपसतो, हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडूण ये अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर टीका केली.
COMMENTS